
वोलोडिमीर झेलेन्स्की लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ही भेट होण्याआधीच रशियाने धक्कादायक कृत्य केले आहे. या एका कृत्यामुळे आता युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Russia Attack On Ukraine : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करार घडवून आणला आहे. या करारानंतर आता गाझा पट्टीतील संघर्ष थांबला आहे. आता समस्त जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाकडे लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही देशांतील थांबवतील अशी आशा आता बाळसं धरू लागली आहे. दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की हेदेखील रशियावर दबाव वाढवावा यासाठी अमेरिकेशी संवाद साधत आहेत. लवकरच ते डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता ही संभाव्य भेड घडून येण्याआधीच रशियाने मोठी खेळी केली केली आहे. रशियाने युक्रेनच्या दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या शहरावर हल्ला केल आहे. या हल्ल्यात एकूण 7 युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत.
झेलेन्स्की घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
रशियाच्या या हल्ल्यामुळे आता हे युद्ध पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनमधील खारकीव या दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या शहरावर ग्लाईड बॉम्ब आणि ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आले आहे. झेलेन्स्की लवकरच ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. आम्हाला युद्ध लढण्यासाठी मदत करा, शस्त्र पुरवा तसेच शक्य होईल तेवढ्या लवकर शांतता घडवून आणा अशी भूमिका घेऊन झेलेन्स्की ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीची रशियाने हे हल्ले केले आहेत.
50 रुग्णांना बाहेर काढावे लागले
युक्रेनमधील विभागीय प्रमुख ओलेह सिनीहुबोव्ह यांनी या हल्ल्याबद्दल माहिती दिली आहे. युक्रेनच्या उत्तर-पूर्व भागात खारकीव येथे रशियाने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे 50 रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढावा लागले. तर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यामध्ये प्रामुख्याने उर्जा पुरवणारी ठिकाणं लक्ष्य होती. प्रत्यके दिवशी, प्रत्येक रात्री रशियन सेना विजेच्या तारा, नैसर्गिक वायू असलेल्या ठिकाणांवर हल्ले करत आहे, असा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.
43 टक्क्यांनी मदत घटली
दरम्यान, रशियाविरोधात दोन हात करण्यासाठी झेलेन्स्की वेगवेगळ्या देशांकडे मदत मागत आहेत. मात्र त्यांना मिळत असलेल्या मदतीत अलीकडे घट झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत या वर्षाच्या सहा महिन्यांच्या तुलनेत 43 टक्क्यांनी युक्रेनाला मिळणाऱ्या मदतीत घट झाली आहे. येत्या शुक्रवारी झेलेन्स्की ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्याआधीच रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे आता पुढे काय होणार? अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
